कारण बघा आपण एवढी काम केली आहेत ना आता किती एक लाख कोटीचं काय दादा एक लाख कोटीचा ना एक लाख कोटी जवळपास 90 हजार च्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी बघा तुम्हाला मी सांगतो हे विरोधक किती खोटं सांगतात शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अरे आतापर्यंतच्या इतिहासात दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार कोटी आपण एनडीआरएफ चे निर्णय बदलले दुप्पट केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामध्ये होणारे नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो गोगल गायने केलेलं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो.
आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती ती आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले वर्षाला त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आणखी आपण भर टाकली बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे अशा योजना आपण केल्या 45 पन्नास हजार कोटीच्या योजना केल्या आणि महाविकास आघाडीने जे रेगुलर कर्जफेड करणाऱ्याला 50000 हजार रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली पैसे दिले का पैसे आपल्या सरकारने दिले आपण देतोय आपण सुरू
केले ते म्हणजे घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कोणी करायची मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे.
त्याला आता आपण दिलं आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली जो मागेल त्याला सोलर का तुमच्या पोटात दुखतंय आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती याला जबाबदार कोण काँग्रेसने पन्नास 60 वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं पण या दोन वर्षांमध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये
पैसे जात आहेत देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली शेतकऱ्यांना वरदान ठरणारी सरकार बदलल्यावर लगेच त्याची लावली चालू केल्यामुळे रद्द करा अरे शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय आपलं सरकार आल्यानंतर पहिला आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे तो दिलासा देखील आज सिंचन अजित दादा पण होते.
अगोदर मी होतो आणि चार मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिल्या होत्या चार चार योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आपल्या सरकारने जवळपास 130 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि 13 लाख हेक्टर जमीन आता ओलिता खाली येणार आहे 13 लाख याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय आणि शेतकरी बांधव जो आहे काय शेतकऱ्याचं दुःख कोणाला कळणार आपल्यालाच कळणार मी गावाला गेलो की हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो अरे काय गाडी चालवत जाऊ आठ तास दहा तास आठ दहा तासात मी तर दहा हजार फाईल सह्या करेन आणि सगळ्यांना माहित आहे.
मुख्यमंत्री मदत योजना कुठली आपली ती मुख्यमंत्री सहा योजना अरे तुम्ही दोन कोटी फक्त दिले या
एकनाथ शिंदेने 250 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहायताने आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो बघा एकच आहे मी आरोपाला उत्तर कामातून देतो आरोप कितीही करा पण आम्हाला तुम्ही विचलित करू शकत नाही आमचा फोकस जो आहे कामावर आहे पण हे काय जे झालंय घडलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे पाहिजे म्हणून सांगतोय मी आणि म्हणून शेतकऱ्याला शेतकऱ्याचे दुःख कळतं आणि म्हणूनच आपले सर्वजण बहुतेक लोक आज शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत.
त्याला कधीही हात आकडता घेत नाही आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण योजना बोले लगेच सांगितलं लाडका भाऊ आठवला नाही का आता लाडका भावाला पण आपण दिलंय ना दहा लाख भाऊ आपले त्यांना आपण दहा हजारा पर्यंत स्टायफंड महिन्याला कधी झाली होती योजना बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार आता तिथं या लाडकी बहिणींच्यामुळे ती लपून गेली योजना ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोहोचवायला लागेल तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं कसं असू शकतं भावाचा बद्दल जाऊद्या मी बोलत नाही आणि म्हणून कुणी बोलावं आज आपण अडीच कोटी आपल्या भगिनींना मी आपल्याला सांगतो अडीच कोटी म्हणजे आकडा मोठा आहे मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं अजित दादांनी सांगितलं की कशी आम्ही सोपी करतोय आता त्यांना असं वाटतंय की ही योजना होऊच नये आता मला सांगा पहिले तर विरोध केला आणि मगाशी देवेंद्रजी पण म्हणाले की बाबा ते पण आता सगळीकडे फिरायला लागले मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलं आहे.
इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री असंविधानिक मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार योजनांना तुम्ही बोलला होता बरोबर ठीक आहे चांगला आहे पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण त्यामुळे आमचं सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार .
आज तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनींना आपण देणार तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका बहिणीला तीन गॅस सिलेंडर हे सहा झाले आता चिंताच गेली ना पंकजाताई बरोबर ना चिंता गेली चिंता करणारे हे सरकार आहे कारण आपण बघितले आपली आई आपली भगिनी आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची आता म्हणून हे सरकार जनतेचं माझ्या भगिनींची चिंता करणारी आहे तुम्हाला टेन्शन दे तुमचं दूर करणारी आहे एसटी मध्ये 50 टक्के सवलत देऊन टाकली अरे तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली ज्येष्ठांना आपण मोफत
केलंय आज भगिनींसाठी देखील या बहिणींसाठी देखील आपण पण बघा त्याच्यामध्ये सगळ्यांना देतोय ना जात पात धर्म काय पाहतोय का सगळे लोकं त्याच्यात लाभार्थी आहेत.
आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नरेटिव्ह पसरवू शकता आता नाही पसरवू शकत ते बोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देत आहेत हे असे लोक कुठे भेटणार असं सरकार कुठे भेटणार त्यामुळे तुमचा आता खोटं खोटारडेपणा चालणार नाही फक्त एवढंच आहे कोणाचं त्याचं नाव घेताय बघा खोटा बोला पण रेटून बोला हे आता चालणार नाही पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोहोचवलं पाहिजे मगाशी देवेंद्रजी पण बोलले ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत सावत्र भाऊ तिकडे आहेत सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत आम्हीच देतोय .
आम्हीच देतोय सगळ्या माझ्या आमच्या बहिणी हुशार आहेत त्यांना माहित आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट खटाखट नाही पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे मोदी गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस किती वर्ष बोललं गरीबी हटली का नाही गरीब हटला गरिबी नाही हटली पण मोदीजींनी पटापट पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणलं की नाही आता बघा राजीव गांधीच एकदा बोलले होते केंद्रातून एक रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोहोचतात पंधरा पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात हे कोण बोललं राजीव गांधी बोलले आता जर ते सरकार असतं तर हे पंधराशे रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट तीन हजार रुपये महिन्याला 18 हजार रुपये 18 दुणे 36 हजार रुपये एका घरात हे डायरेक्ट आता दुसरं सरकार असतं तर किती पंधरा टक्के गेले असते पण त्यामुळे लोकांनाही माहित आहे की आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधले एजंट बीजे कोण कोण एक तलाठी मध्ये त्यांनी
काहीतरी पैसे मागितले मी कलेक्टरला फोन केला त्याला बोललो डायरेक्ट सस्पेंड कर सस्पेंड करून थांबू नको त्याला जेलमध्ये टाक डायरेक्ट त्याच्यावर एफआयआर लॉन्च कर अरे आम्ही योजना करतो आणि तिथे पैसे 50 रुपये घ्यायचे शंभर रुपये घ्यायचे बिलकुल चालणार नाही आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला अडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंद करायचं काम कोणाचं आहे नाही.
तुम्हाला पण कोण भेटला असेल तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत हा आपला उद्देश आहे आता बघा
तीन पक्ष चार पक्ष आपल्या महायुतीत आहेत उद्देश आपला काय आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोहोचवणे त्या आणि म्हणून चिंता करू नका तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे लक्षात ठेवा त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावा .
आज एक माहोल बनलाय चांगलं वातावरण झालंय बघा तुम्हाला पण थोडसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर पण केलं की नाही करामत आम्ही लोकांनी जादू केली की
नाही आता हे पोहोचवायचं लोकांपर्यंत घराघरांमध्ये हे काम तुमचं आहे ही योजना जी आपण ज्या योजना केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सिलेंडरची दुसरा आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती त्याचबरोबर मुलींचे शिक्षण आपण 50 टक्के होतं ते शंभर टक्के पूर्णपणे फी भरण्याचे उच्च शिक्षण मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट मला साडेबारा वाजता कळलं की एक मुली एक मुलगी त्या मुलीने आत्महत्या केली का 50 टक्के सरकार भरत होतं 50 टक्के तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती त्यामुळे तिने आत्महत्या केली मी पावणे दोन वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला
रात्री चंद्रकांत पाटलांनी फोन उचलला मी त्यांना पावणे दोन वाजता सांगितलं असं असं झालेलं आहे.
तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करा आणि किती पैसे लागतात त्याला पूर्ण शंभर टक्के माफ करण्यासाठी आणि आपल्या सरकारने ते शंभर टक्के मुलींचे शिक्षण मोफत केलेला आहे हे पहिलं राज्य आहे आणि त्यामुळे आपण सगळं जे आहे याच्यामध्ये मुलींचे शिक्षण आता मुलांना आपण 50 टक्के करतो दिले देतोय मुलांना आता आपण दहा हजार रुपया पर्यंत ती आपण अप्रेंटिसशिप देतोय आज वारकरी संप्रदाय जो आहे पंढरीचा वारी चालल्यात त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पहिल्यांदा प्रत्येक वीस हजार रुपये एक आपण अनुदान दिलं लगेच पोटात लागलं बोले हे काय वारकऱ्यांना वारकऱ्यांना अरे ते समाज प्रबोधनाचे काम करतात दिंडीमध्ये पर्यावरण हे ते विषय घेऊन जातात आणि वारकरी हा या राज्याचा एक प्रमुख घटक आहे तुम्ही तर दिलं नाही पण तुम्ही त्यांच्यावर टीका करायला लागले.
सरकारवर टीका करायला लागले वारकरी बरोबर निवडणुकीत तुमच्यावर करतील काय त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवतील त्यानंतर अनेक योजना आपण केल्या हे सगळे जे योजना आहेत या सर्व योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आपण सरकारने घेतलेले निर्णय खास आजची बैठक आजची ही आपली मीटिंग आहे सभा फक्त आणि फक्त केवळ आपल्या योजना लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो हे लक्षात ठेवा.
आपण कारण शेवटी तुम्ही एक ताकद आहात आपली सगळे लोक मगाशी म्हणाले महिला भगिनींची जास्ती जबाबदारी आहे कारण डायरेक्ट किचन पर्यंत जातात बांधव थोडे बाहेर थांबतात दोघांनी काम करायचं आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला या योजना ज्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे त्या साठी ही आपली योजना आहे त्याचबरोबर मी एक दुसरी आपली योजना एक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण केली कारण काही आमदार काही नगरसेवक आपल्या मतदारसंघातले यात्रेकर ज्यांना सगळ्यांना शक्य होत नाही यात्रा करणं मग ते घेऊन जायचे रेल्वेने बस मधून आणि मग आपल्या मला वाटतं आमदार प्रताप सरनाईक राम कदम वगैरे प्रकाश सुर्वे या सगळ्यांनी सांगितलं मला की बाबा हे करा तर ती एक योजना केले