जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात सर्वदूर समाधानकारक असा पाऊस होतोय परंतु या पावसामुळे राज्याच्या काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी काही भागांमध्ये पूर परिस्थिती आहे याच्यामुळे फळबाग असतील किंवा खरीपाची पिक असतील याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरलेला असताना पीक विम्याचा क्लेम करावा का आणि करावा तर तो कसा करावा याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते याच अनुषंगाने आजच्या ब्लॉग मध्ये माध्यमातून तुम्ही जर
पीक विमाचा क्लेम करावा का ?
खरीपाचा पीक विमा भरलेला असेल तर, या कालावधीमध्ये पीक विमाचा क्लेम करावा का? ई पीक पाहणी याच्यासाठी किती महत्त्वाची आहे.याचबरोबर हा क्लेम ऑनलाईन पद्धतीने कसा करावा ? हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी खरीपाचा असेल रबीचा असेल फळ पिकांचा असेल क्लेम कसा करावा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी वेगवेगळे धोके समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत सध्या आपण जर पाहिलं तर फ्लड असेल किंवा एक्सेस रेनफॉल असेल अशा बाबींचा आपण क्लेम करू शकता.
मित्रांनो क्लेम करण्यासाठी तुम्ही ” पीएमएफआयच्या वेब पोर्टल ” च्या माध्यमातूनही क्लेम करू शकता. ऑफलाईन पद्धतीने कृषी सहायकाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे सुद्धा क्लेम करू शकता. त्यांचे जे काही टोल फ्री नंबर दिलेले आहेत. तर त्याच्यावरती करू शकता कंपनीच्या मेल आयडी वरती जे काही आपल्या पॉलिसी वरती मेल आयडी आलेले आहे त्याच्यावरती क्लेम करू शकता आणि सर्वात सोपी अशी महत्त्वाची अशी जी ऑप्शन आहे ती म्हणजे ऑनलाईन क्लेमची याच्यासाठी तुम्ही पीएम एफबीआयचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून याच्यामध्ये क्लेम करू शकता.
क्लेम ऑनलाईन पद्धतीने कसा करावा
- मित्रांनो पीएम एफबयूआय ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवल्या जात आहेत.
- रजिस्टर एज फार्मर लॉगिन फॉर पॉलिसीज कंटिन्यू गेस्ट आपण गेस्ट म्हणून सुद्धा याच्या अंतर्गत जाऊ शकता. परंतु खूप सारी माहिती आपल्याला याच्या अंतर्गत गेस्ट मध्ये भरावी लागणार आहे.
- याच्या अंतर्गत आपण जर लॉगिन बनवलेला असेल तर आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.
- जर आपण लॉगिन क्रिएट केलेला नसेल तर आपल्याला सर्व माहिती रजिस्ट्रेशन पूर्ण करून आपला लॉगिन आयडी पासवर्ड बनवावा लागणार आहे.
- आता याच्यामध्ये आपल्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड असेल तर आपल्याला मोबाईल नंबर जो कॅप्चा कोड आहे.
- तो टाकून या ठिकाणी लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत.
- याच्या अंतर्गत क्रॉप चे ऑप्शन दाखवली जाते याच्यावरती क्लिक करायचंय याच्या अंतर्गत लॉस इंटिमेशन वरती आपल्याला क्लिक करायचंय.
- याच्यानंतर परत एकदा आपल्याला मोबाईल नंबर विचारला जातोय मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी एंटर करायचा आहे. आणि ओटीपी एंटर केल्यानंतर आपल्या समोर एक पेज खुलेल ज्याच्यामध्ये आपल्याला खरीप हंगाम रबी हंगाम जे काही हंगाम असेल तो सिलेक्ट करायचा आहे .
- आता याच्यामध्ये आपल्याला खरीप सिलेक्ट करायचा आहे .
- याच्यानंतर योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना जर तुमचा फळ पिकोमा असेल तर तुम्ही आर डब्ल्यू बी सिलेक्ट करू शकता.
- याच्यानंतर तुम्हाला खाली निवडायचंय ते म्हणजे राज्य याच्या अंतर्गत आपल्याला महाराष्ट्र निवडायचंय आणि सिलेक्ट वरती क्लिक करायचंय.
- याच्यानंतर पुढे आपल्याला विचारलं जाईल की, तुम्ही पॉलिसी जी एनरोल केलेली आहे काढलेली आहे ती कुठे काढलेली आहे.
- तुम्ही स्वतः काढली आहे CSSC वर काढली आहे एआयडी काढलेली आहे किंवा बँकेकडून काढलेली आहे ज्या माध्यमातून आपण पॉलिसी काढलेली असेल ते माध्यम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय.
- आणि याच्याखाली तुमच्याकडे पॉलिसी नंबर आहे का असं विचारलं जाईल पॉलिसी नंबर असेल तर होय.
- तुम्ही त्या ठिकाणी टिक करू शकता. पॉलिसी नंबर टाकल्याबरोबर तुम्हाला तुमची सर्व माहिती दाखवली जाईल.
- परंतु आता समजा तुमच्याकडे पॉलिसी नंबर नसेल तर नो केल्यानंतर पुढे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
- ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा जो काही राज्य आहे जिल्हा आहे हे सगळं निवडावं लागणार आहे.
- आता राज्य निवडलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्यातील आपल्याला तालुके दाखवले जातील तालुका निवडायचा आहे.
- तालुका निवडल्यानंतर रेव्हेन्यू सर्कल निवडावा लागणार आहे.
- रेव्हेन्यू सर्कलच्या अंतर्गत परत ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत.
- नंतर आपल्याला आपलं जे काही गाव असेल ही माहिती सर्व निवडायची आहे, त्याच्यानंतर आट्यानुसार आपलं जे पहिलं पीक निवडायचं आहे त्याच्यानंतर आट्यानुसार आपला जे काही सर्वे नंबर असेल गट नंबर असेल तो निवडायचा आहे.
- आपला सातबारा वरील सर्वे नंबर निवडायचा आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पॉलिसी दाखवली जाईल.
- या पॉलिसी वरती सिलेक्ट केल्यानंतर आपण ज्या ज्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे ती ती पिकं दाखवली जातील याच्यामध्ये आपल्या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर सर्व पिकांना टिक करायची आहे.
- एकाच पिकाचं पर्टिक्युलर नुकसान झाले असेल तर, एका पिकाचा आपण क्लेम करू शकता.
- याच्यानंतर आपल्याला क्लेमला निवडल्यानंतर पुढचा जे काही इन्सिडन्स आहे तो काय आहे.
- तो आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये सध्या एक्सेस रेनफॉल अतिवृष्टी होते किंवा काही भागांमध्ये पूर परिस्थिती आलेली आहे तर एक्सेस रेनफॉल किंवा फ्लड मध्ये आपण या ठिकाणी क्लेम करू शकता.
- जर तुमच्याकडे पूर आलेला असेल पुराची नोंद असेल तर तुम्ही फ्लड मध्ये सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याकडे समजा अतिवृष्टी झालेली आहे.
- अतिवृष्टीच्या नोंदी आहेत पाऊस सारखा होतोय पिकं खराब झालेले आहेत.
- एक्सेस रेनफॉल निवडलाय याच्यानंतर आपल्याला इन्सिडेंटची तारीख द्यायची आहे 72 तासाच्या आतमध्ये क्लेम करणं बंधनकारक आहे.
- त्यानुसार आपल्याला क्लेमची जी काही इन्सिडेंटची जी तारीख आहे ती निवडायची आहे पीक आपलं कसं आहे स्टँडिंग क्रॉप आहे हार्वेस्टेड आहे वगैरे आता सध्या स्टँडिंग क्रॉप अवस्थेत आहे.
- आपल्याला स्टँडिंग क्रॉप निवडायचे आता पिकाचं किती टक्के नुकसान झाले 50% 40% 70% 80% 100% जे काही टक्केवारी असेल ते आपल्याला याच्यामध्ये द्यायचे रिमार्क काय असतील ते याच्यात द्यायचे.
- याच्यानंतर आपल्या पिकाचा एक फोटो आपल्याला याच्यामध्ये काढावा लागणार आहे.
- अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लोकेशनच्या वगैरे परमिशन मागितल्या जातील कॅमेरा खुलेल किंवा आपण याच्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ देखील बनवू शकता.
- याच्यानंतर आपलं नाव मोबाईल नंबर आपला आधार नंबर या ठिकाणी दाखवलेला आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला याला सबमिट करायचंय .
- पुन्हा एकदा एक ओटीपी पाठवून आपली पॉलिसी सबमिट केली जाईल आपल्याला एसएमएस द्वारे एक डॉक्युमेंट नंबर दिला जाईल .
- हा डॉकेट नंबर आपल्याला पुढे फ्युचर मध्ये आपल्या पॉलिसीची स्थिती पाहण्यासाठी दाखवला जाणार आहे वापरला जाणार आहे .
अशाप्रकारे आपल्या डॉकेट आयडी सह आपल्या क्लेमची स्टेटस सुद्धा पाहू शकता पीएमएफ च्या पोर्टलला सुद्धा आपल्या क्लेमची पुन्हा स्टेटस दाखवली जाते मित्रांनो 8 मार्च 2024 च्या नवीन गाईडलाईन्स नुसार पूर्वी जे काही पीक विमाच वितरण करत असताना जे काही कालावधी मोजला जात होता या कालावधी नुसार टक्केवारी गृही धरली जात होते त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता स्टँडिंग क्रॉप असेल हार्वेस्टर असेल किंवा इतर कुठल्या परिस्थितीमध्ये असेल त्या पिकाच्या दिवसाच्या म्हणजे वाढीच्या
वयानुसार जे काही कॅल्क्युलेशन केलं जात होतं.
याच्यामध्ये आता बदल केलेले आहेत त्याच्यामुळे मिळणारी नुकसान भरपाई ही जवळजवळ आता निश्चित करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पूर्वी सारखं की ज्यावेळेस कधी शेवटच्या अवस्थेमध्ये जर क्लेम केला तरच पीक विमा मिळेल असं वगैरे राहिलेलं नाही कारण या नवीन गाईडलाईन्स नुसार आता तुम्ही कधी तुमच्या पिकाचं ज्यावेळेस नुकसान होईल त्यावेळेस तुम्ही याचा क्लेम करू शकता आता याच्यानंतर महत्त्वाचा असा विषय आहे तो म्हणजे पी पीक पाहणीचा चा मित्रांनो ईपीक पाहणी मध्ये कसं आहे की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उडीद आहे.
किंवा मका आहे किंवा ऊस आहे आणि त्या शेतकऱ्याने सोयाबीनचा पीक विमा भरलाय आणि पीक विम्याचा क्लेम केला कंपनीच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी पाहणी करताना शेतामध्ये दुसरं पीक आढळून आलं आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही वादंग निर्माण झालं तर त्या शेतकऱ्याच्या ई पीक पाहणीचा डाटा पाहिला जातो किंवा मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये कॅलॅमिटी आली मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये नुकसान झालं पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीमुळे एखादं महसूल मंडळ बाधित झालं अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अधिसूचना वगैरे निघाली तर अशा परिस्थितीमध्ये तुमची ई पीक पाहणी झालेला असणं आवश्यक आहे.
आणि ई पीपीक पाहणी केल्यानंतरच क्लेम करावं असं काही नाही तुम्ही आता क्लेम करून तुमचं आता जर नुकसान झालेलं असेल तर नुकसान झाल्यानंतर तुम्ही क्लेम करू शकता आणि तुमची एक ऑगस्ट पासून ईपी पाहणी सुरू झाल्यानंतर सुद्धा ईपीक पाहणी करू शकता किंवा इपीक पाहणी झाल्यानंतर तुमचं जर नुकसान झालं तरीसुद्धा तुम्ही क्लेम करू शकता परंतु इपीक पाहणी करणं देखील कंपलसरी आहे आणि तुमचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई साठी हा क्रॉप इन्शुरन्सचा क्लेम करणं देखील महत्त्वाचं आहे 72 तासाची याच्यामध्ये अट आहे आपलं नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये आपला पीक विमाचा क्लेम करावा परंतु आता समजा एखाद्या शेतकऱ्याचं पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलंय त्याचं पूर्णपणे नुकसान झालंय आणि 72 तास होत आलेत परंतु ई पीपीक पाहणी झाली नाही म्हणून जर कोणी क्लेम करण्यापासून वाट पाहत असेल तर ते मात्र चुकीचं आहे तुम्ही तात्काळ तुमचा क्लेम करू शकता आणि ज्यावेळेस कधी याची ईपी पीपी पाहणी सुरू होईल त्यावेळेस आपले ई पीपी पाहण्याने या पिकाची पेरणी केली होती किंवा पेरा होता अशा प्रकारची नोंद करू शकता तर मित्रांनो अशाप्रकारे या क्रॉप इन्शुरन्स क्लेमच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती.
हा क्लेम तुम्ही पेरणी केल्यापासून तुमच्या पीक घरा येईपर्यंत कधीही करू शकता ज्यावेळेस तुमचं नुकसान पूर्णपणे होईल किंवा नुकसानाची टक्केवारी जास्त असेल त्यावेळेस करा कारण बरेच सारे शेतकरी आताही क्लेम करतात त्याच्यानंतर पुन्हा पीक वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा काढणीच्या अवस्थेमध्ये पुन्हा काही थोडंफार नुकसान झालं तर पुन्हा एकदा करतात आणि दुबार क्लेम केल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं पुन्हा कॅल्क्युलेशन करण्यामध्ये किंवा त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यामध्ये अडचण
होते.
तर दुबार क्लेम करण्याचा प्रयत्न करू नका थोडी थोडीशी वाट पाहून आपलं ज्यावेळेस कधी नुकसान होईल किंवा नुकसान दिसेल त्यावेळेस आपला क्लेम करण्याचा प्रयत्न करा याच्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या अधिसूचना असतील किंवा इतर काही बाबी असतील त्या सुद्धा बाबी पाहायला भेटतील आता सध्या जसं एक्सेस रेनफॉल चाललाय फ्लड चाललाय याच्यानंतर कधी समजा पावसाचा खंड येऊ शकतो किंवा तुमच्या भागामध्ये एखादा पेस अटॅक किंवा डिसीज वगैरे येऊ शकतो किंवा असं जर काही आलं किंवा तशाबद्दलचं जर काही प्रशासनाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलं तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी त्या बाबीसाठी क्लेम करू शकता.
आता बऱ्याच वेळा काय होतं की येलो मोजाक येलो मोजाक वगैरेची हवा उठवली जाते किंवा उठते आता जसं की आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून हिंगोली असेल वाशिम असेल या भागामध्ये कंटिन्यू पाऊस चाललेला आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सोयाबीनचे असतील इतर पिकांची असतील पानं पिवळी पडायला लागलेली आहेत आता एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून किंवा एखाद्या ठिकाणी जर येलो मोजागचे म्हणून क्लेम करायला सुरु केले आणि त्या भागामध्ये कुठलाही प्रादुर्भाव न दिसताना सर्व शेतकऱ्यांनी केलं तर ते क्लेम बाद केले जातात परंतु त्या येल्लोमोजकचा जर प्रादुर्भाव दिसून आला आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जर आव्हान करण्यात आलं तर त्या आव्हानाच्या वेळेस नक्की आपलं जर नुकसान झालं असेल तर ते क्लेम करू शकता तर वैयक्तिक क्लेम करताना ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात ठेवा एक्सेस रेनफॉल मध्ये तुम्ही वैयक्तिक क्लेम करू शकता तुमचा फ्लड मध्ये असेल तर वैयक्तिक क्लेम करू शकता आणि याच बाबींसाठी तुमच्या अधिसूचना देखील निघू शकतात.
आता अतिवृष्टीच्या अंतर्गत जर तुम्ही क्लेम करत असाल तर अतिवृष्टीसाठी जो काही रेनचा डाटा आहे महारेनंच्या
पोर्टलला जो डाटा दाखवला जातो आपल्या भागामध्ये पडलेल्या पावसाचा तो डाटा मात्र वेळोवेळी पाहत चला जेणेकरून आपल्या भागामध्ये त्या प्रमाणामध्ये पाऊस आहे का एक्सेस रेनफॉल काउंट झालेला आहे का हे या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो अशाप्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद.